Gadchiroli district highlights…24/10/2022
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मनाई केली तरी गेला होता शेतात…मनाई करतानाचे वीडियो मिळाले…
गडचिरोली तालुक्यातील कलमटोला या ठिकाणी नरभक्षक वाघाने एक वृद्ध इसमाचा शिकार केल्याची घटना आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.
वाघाने शिकार केलेल्या व्यक्तीचे नाव प्रभाकर तुकाराम निकुरे वय 60वर्ष असून,वन विभागाच्या वतीने वारंवार मनाई करण्यात आल्यानंतर सुध्दा मुद्दाम दुर्लक्ष करून शेतात गेल्याने, आज दिवाळी च्याच दिवशी आज त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची विदारक परिस्थिती आज पाहायला मिळत आहे.दोन महिन्यापूर्वी मृतक प्रभाकर च्या मोठ्या भावाचा मृत्यू वाघाच्या हल्यात झालेला होता हे विशेष...
दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने या परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली असून लोकांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.शिकार केल्याची तक्रार मिळताच पोलिस यंत्रणा आणि वन विभागाची यंत्रणा घटनास्थळी पोहचलेली आहे,घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.




