खासदार चषक क्रिकेट स्पर्धेत अशोक नेते यांच्या वतीने 21 हजाराचे प्रथम बक्षीस जाहीर…

0
136

Chandrpur district highlights

दिनांक..3/12/2022

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा 2022 चे आयोजन करण्यात आले होते.

या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन या क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले आहे.या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी युवकांनी मैदानी खेळ खेळून आपले आरोग्य चांगले राहते आणि या खेळांमुळे युवकांना भविष्यात मोठे नामांकित खेळाडू होण्याची संधी सुध्दा मिळू शकते असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले होते.

खासदार क्रिकेट स्पर्धेचे प्रथम क्रमांक ज्या टीम कडून पटकावला जाणार त्याला 21 हजाराचे प्रथम बक्षीस खासदार अशोक नेते यांच्या वतीने तथा,17 हजाराचे द्वितीय बक्षीस,5 हजाराचे तृतीय बक्षीस आयोजक मंडळाकडून देण्याचे जाहीर केले आहे.

या प्रसंगी तालुकाध्यक्ष अविनाश पाल यांच्या सह नगर सेवक सतीश बोम्मावार,कोषाध्यक्ष अर्जुन भोयर,युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष विनोद धोटे,ज्येष्ठ नेते प्रकाश पाटील गड्डमवार,नगरसेविका नीलमताई निखिल सुरमवार,माजी जि प सदस्या योगिताताई धनराज डबले,माजी सभापती छायाताई शेंडे,सरपंच प्रितीताई गोहणे,ग्राप सदस्य प्रमोद भोपये,भाजपा कार्यकर्ता प्रभाकर चौधरी,दलीत आघाडीचे लोकनाथ रायपूरे, गितेश चीताडे,युवा कार्यकर्ते अंकुश भोपये,अभिषेक बोरकुटे, व इतर शेकडो युवा कार्यकर्ते या स्पर्धेत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here