वाघाचा मानवी संघर्ष कधी थांबेल…..
Gadchiroli district highlights..26 डिसेंबर.
गडचिरोली मुख्यालयापासून अवघ्या बारा किमी अंतरावर असलेल्या आंबेटोला गावात आपल्या कुटुंबासोबत शेतात काम करीत असलेल्या एका महिलेला वाघाने हल्ला करून गंभीर जख्मी केल्याची घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
वाघाच्या हल्यात जख्मी झालेल्या महिलेचे नाव मंगला प्रभाकर कोहपरे वय 52 वर्ष असून, ती महिला आपल्या शेतात करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हमला केल्यामुळे आज या महिलेचे प्राण संकटात सापडले आहेत.
वाघाने हल्ला केल्याची माहिती मिळाली असता वन विभागाची यंत्रणा घटनास्थळी पोहचलेली होती,रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध झाली नसल्याने गावकऱ्यांच्या मदतीने वन विभागाच्या चारचाकी वाहनात मागच्या डाल्यात टाकून सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले होते हे विशेष.
या हल्याच्या वेळी महिलेसोबत तिचा पती,आणि मुलगा सरपण गोळा करीत असताना जवळच असलेल्या धानाच्या डीबली वर चढल्यामुळे नशिबाने तिच्या पतीचे प्राण वाचले होते.
महिलेच्या गळ्यावर,छातीवर मोठ्या जखमा झालेल्या असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लगेच प्राथमिक उपचार सुरू केले होते.
वाघाचे हल्ले वारंवार होत असल्याने या परिसरात लोकांमध्ये मोठी दहशत निर्माण झालेली असून वन विभागावर तसेच वाघाला जेरबंद करण्यासाठी राज्य सरकारच्या चालढकल पद्धतीवर नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला होता.
या परिसरातील नागरिकांच्या वतीने वन विभागाच्या वतीने वाघाचा बंदोबस्त योग्य रित्या होत नसल्याने वन अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.