Gadchiroli district highlights.27/12/2022.
गडचिरोली शहरापासून अवघ्या बारा किमी अंतरावर असलेल्या आंबेटोला गावात काल दुपारी वाघाने मंगला प्रभाकर कोहपरे या 52 वर्षीय महिलेवर हल्ला करून गंभीर जख्मी केल्याची घटना घडली होती.
वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने गावकऱ्यांच्या मदतीने वन विभागाच्या चारचाकी गाडीच्या डाल्यात टाकून त्या जख्मी महिलेला सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले होते,सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी तिच्यावर उपचार चालू असताना,दुर्दैवाने रात्रो एक वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
वन विभागाच्या वतीने मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबियांना 25000 रुपयांची मदत देण्यात आली असून,यापुढे राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या नियमानुसार अजून आर्थिक मोबदला दिला जाणार असल्याची माहिती वन विभागाच्या वतीने सांगण्यात आली आहे.
या घटनेच्या वेळी मृतक महिलेचा पती हा आरडाओरड करून धानाच्या पुंजण्यावर चढल्यामुळे नशिबाने त्याचे जीव वाचले होते हे विशेष..
वन विभागाच्या वतीने नेहमी प्रमाणे आर्थिक मदत केली जाणारच,परंतु वाघाचे बंदोबस्त करण्याची योग्य उपाययोजना करण्यात वन विभाग आणि राज्य सरकार हे सपशेल फेल ठरल्याची परिस्थिती आज पाहायला मिळत आहे.
या घटनेमुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात असून आता आर या पार ची कारवाई करावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे.




